ठाकरे गटाला मोठा धक्का ; 37 वर्ष एकनिष्ठ राहिलेला शिलेदार साथ सोडत शिंदेंच्या वाटेवर ; कोण आहेत त्र्यंबक तुपे?


छत्रपती संभाजीनगर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना छत्रपती संभाजी नगरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.पक्षात ३७ वर्ष एकनिष्ठ राहिलेल्या सहसंपर्कप्रमुख व माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी पदाचा राजीनामा दिला होता. या त्र्यंबक तुपेंचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश झाला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आहे.

कोण आहेत त्र्यंबक तुपे?

त्र्यंबक तुपे हे शिवसेना उद्धव ठाकरे गटातील शहरातील महत्त्वाचे नेते आहेत. राज्यात बाळासाहेब ठाकरेंची लाट असताना त्र्यंबक तुपे यांनी १९८८ मध्ये शिवसेनेत काम सुरू केलं. त्यांच्या कामामुळे त्यांना पक्ष संधी मिळत गेली. २०१६ मध्ये यांना महापौर होण्याची संधी मिळाली. २०१९ ला तुपे महापौर राहिले. त्यासोबतच त्यांनी सभागृह नेते, महापौर, सभापती पदासोबतच शिवसेनेच्या ग्रामीण भागाचे जिल्हाप्रमुख म्हणून देखील काम केलं आहे. त्यांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख या पदाची जबाबदारी देण्यात आली होती.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्वी पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी त्र्यंबक तुपे यांचा शिंदे गटात प्रवेश घडवून आणल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. पक्षप्रवेश करताना त्र्यंबक तुपे म्हणाले की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत माझी कुठलीच नाराजी नाही. मात्र मला वार्डाच्या विकासाचा विचार करणे गरजेचे आहे असं त्यांनी म्हटलं. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाठ, मराठवाडा सचिव पटवर्धन, माजी महापौर विकास जैन, दीपक पवार हे उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!