Politics News : काँग्रेसला मोठा धक्का; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांची सून करणार भाजपमध्ये प्रवेश..!!
Politics News : राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांची सून अर्चना पाटील चाकूरकर ह्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे.
अर्चना पाटील यांनी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्या उद्या मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांच्या मध्यस्थीने काँग्रेसचे आणखी एक नेते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. मराठवाड्यातील नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
त्यानंतर मराठवाड्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. मात्र या विषयावर अर्चना पाटील चाकूरकर यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
Views:
[jp_post_view]