भाजपला मोठा धक्का! ऐन निवडणुकीत तालुकाध्यक्षांचा तडकाफडकी पदाचा राजीनामा

पुणे : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्या मतदान होत आहे. या मतदानासाठीच्या प्रचार तोफा थंडावल्या असताना निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. मालवण तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी पदासह पक्षाच्या सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

गेली २२ वर्षे भारतीय जनता पार्टीत एकनिष्ठपणे कार्यरत असणारे भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी आज आपल्या पदाचा आणि पक्षाच्या सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. जिल्हा नेतृत्वाच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि अकार्यक्षमतेमुळे मालवण नगरपालिकेत भाजपचा पराभव झाला असून राणे समर्थक व जुन्या निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांना डावलून दुसऱ्या पक्षातून आलेल्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी दिली असा आरोप मोंडकर यांनी केला आहे.
महापालिका निवडणुकीपूर्वीच मालवण तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी आज आपल्या पदाचा आणि पक्षाच्या सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने भाजपला याचा मोठा फटका बसणार आहे. दरम्यान त्यांनी भाजपने कार्यकर्त्यांचा केवळ निवडणुकीपुरता वापर करून घेतला असल्याचा घणाघात केला आहे.
