कमी पैशात मोठा धमाका! या योजनेत 75 हजारचे कव्हर, प्रीमियम फक्त 200 रुपये, जाणून घ्या फायद्याची माहिती…

मुंबई : अनेकदा आपल्याला आपल्या आयुष्यात छोटी मदतही खूप मोठा आधार ठरतो. यामुळेच आता भारत सरकारने ‘आम आदमी विमा योजना’ सुरू केली आहे, जी आता गरीब लोकांसाठी मोठा आधार बनणार आहे. आता वर्षाला फक्त २०० रुपये एवढा नाममात्र प्रीमियम भरून तुम्हाला ७५,००० रुपयांपर्यंतचा जीवन विमा मिळतो.

यामुळे ही एक फायदेशीर योजना आहे. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) मार्फत चालवली जाणारी ही योजना, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी फायदेशीर ठरत आहे. यामुळे याबाबत माहिती असणे आवश्यक आहे. या योजनेमध्ये जर विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाला, तर कुटुंबाला ७५,००० रुपये मिळतात.
तसेच अपघातामुळे व्यक्तीला पूर्ण अपंगत्व आल्यास, त्याला ७५ हजार रुपये मिळतात, जे उपचारांसाठी किंवा पुढील आयुष्यासाठी उपयोगी पडतात. आणि जर नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाला, तरीही कुटुंबाला ३० हजार रुपये मिळतात. तसेच अपंगत्व आले, तर ३७,५०० रुपयांची मदत मिळते.

या योजनेसाठी काही अटी आहेत. अर्जदाराचे वय १८ ते ५९ वर्षांच्या दरम्यान असावे आणि तो दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील असावा. योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करता येत नाही. तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायत, शहरातील नगरपालिका कार्यालय किंवा LIC च्या अधिकृत एजंट माहिती देईल.
दरम्यान, या योजनेचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे, विमाधारकाच्या कुटुंबातील ९वी ते १२वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या दोन मुलांना दरमहा १०० रुपये शिष्यवृत्ती दिली जात आहे. यामुळे ही योजना फायदेशीर आहे. यामुळे याबाबत माहिती असणे गरजेचे आहे.