शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! ‘या’ २ दिवशी माल आणू नका; पुणे मार्केट यार्ड बंद

पुणे : शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना समोर आली आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डातील व्यवहार पुढील दोन दिवस बंद राहणार आहेत.

महाराष्ट्र दिनानिमित्त शुक्रवार (१ मे) रोजी मार्केट यार्डातील सर्व मुख्य विभागांसह उपबाजार पूर्णपणे बंद राहतील. तसेच शनिवारी (२ मे) साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे फळे, भाजीपाला आणि कांदा-बटाटा विभागातील व्यवहारही बंद राहणार आहेत.
शुक्रवार (१ मे) रोजी फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा विभाग, गूळ-भुसार बाजार, फूलबाजार आणि बाजार समितीचे मुख्य कार्यालय बंद राहील.

शनिवार (२ मे) रोजी फळे, भाजीपाला आणि कांदा-बटाटा विभाग बंद राहतील. मात्र, फूलबाजार आणि भुसार विभागातील व्यवहार नियमितपणे सुरू राहतील.

बाजार समिती प्रशासनाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, या दोन दिवसांत आपला शेतीमाल विक्रीसाठी मार्केट यार्डात आणू नये, जेणेकरून गैरसोय टाळता येईल. तसेच व्यापाऱ्यांनीही याची नोंद घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.