महाराष्ट्रात प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल! ऐन निवडणूकीपूर्वी ‘या’ ७ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या..

मुंबई : राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रात प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल करण्यात येत आहेत. नव्या महायुती सरकारने याआधीदेखील प्रशासकीय पातळीवर फेरबदल केले होते.
त्यानंतर आता पुन्हा नवे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्यातील बड्या IAS स्तरावरच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका येणार असून, अशा निवडणुकीच्या वातावरणात रत्नागिरी, नाशिक, जळगाव आणि पुणे जिल्ह्यातील प्रशासनात काही मोठे बदल केले गेले आहेत. राज्यातील ७ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य सरकारकडून करण्यात आल्या आहेत.
शासनाने संजय कोलटे सारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पद बदल्या केल्या आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अशा विभागाचा समावेश आहे.
संजय कोलटे यांची नियुक्ती साखर आयुक्त पदी झाली आहे या पूर्वी ते शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक होते. संजय कोलटे यांची नियुक्ती होण्याआधी साखर आयक्ताचे पद रिक्त होते.
रत्नागिरी जिल्हाधिकारी पदासाठी मनोज जिंदल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे आयुक्त व्यवस्थापकीय संचालक होते. मनोज जिंदल हे २०१७ पासून राज्यसेवेत कार्यरत आहेत.
महाराष्ट्र केडर मध्ये २०१० च्या बॅचमध्ये भरती झालेले संजय कोलटे यांची साखर आयुक्त पदावरती बदली झाली आहे. ते याआधी शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक होते.
आयएएस अधिकारी देवेंद्र सिंह हे रत्नागिरीचे जिल्हाधिकारी होते. त्यांची बदली आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव पदावर झाली आहे. सध्याचे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त असलेले शेखर सिंह यांची बदली कुंभामेळा आयुक्त पदी झाली आहे.
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी देवेंद्र सिहं यांचीही बदली झाली असून, त्यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव म्हणून करण्यात आली आहे. जलज शर्मा यांची नियुक्ती नाशिक महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. जलज शर्मा हे नाशिक जिल्हाधिकारी पदावर कार्यरत होते.
आयुष प्रसाद यांची नाशिक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. ते जळगाव चे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. आयुष प्रसाद यांचा 2014 मध्ये UPSC परिक्षेत २४व्या रॅँक होता.
आयुष प्रसाद यांची बदली नाशिक जिल्हाधिकारी पदी झाल्यानंतर जळगाव जिल्हाधिकारी पदासाठी रोहन घुघे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी कृषी, शिक्षण आणि स्वास्थ्याच्या क्षेत्रातही कामगीरी केली आहे.