रुपाली चाकणकरांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाराविरोधात मोठी कारवाई, उरुळी कांचनमधील एकासह दोघांना अटक…


उरुळी कांचन : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याविरोधात समाज माध्यमातून २०२४ मध्ये आक्षेपार्ह, अश्लील पोस्ट केल्याचे प्रकार समोर आला. दरम्यान याप्रकणी दोघांना पोलिसांनी अखेर ताब्यात घेतले आहे.

मंगळवारी (ता.१२) रात्री उशिरा अल्ट्राटेक कंपनीकडे जाणाऱ्या एका मंगलकार्यालयाजवळून उरुळी कांचन पोलिसांच्या मदतीने मुंबई सायबर क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

तसेच एकाला उरुळी कांचन जवळील सोरतापवाडी परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. तर त्याच्या साथीदाराला मोहोळ (जि. सोलापूर) येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

अविनाश बापू पुकळे (वय ३० रा. पारे कोकरेवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) असे सोरतापवाडी येथून अटक केलेल्याचे नाव आहे. तर आकाश दिगंबर डाळवे (वय,३०, रा. यावळे, ता. मोहोळ, जि. सोलापूर) याला मोहोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेण्यात आले आहे.

सविस्तर माहिती अशी की, आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या विरोधात फेसबुकवरील “राजकारण महाराष्ट्राचे” या पेजवरून जाणीवपूर्वक आक्षेपार्ह पोस्ट वारंवार करण्यात येत होत्या. या प्रकरणी आयोगाकडून पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती.

दरम्यान, सदर घटनेचा पोलीस तपास करीत असताना आरोपी अविनाश बापू पुकळे हा उरुळी कांचन परिसरात असल्याची माहिती पोलिसांणा मिळाली होती. उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी दीपक यादव, होमगार्ड कांचन व ईटूकडे यांच्या मदतीने सदर आरोपीला अटक करण्यात आली आहे. या पूर्वी या प्रकरणात एकूण ९ आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, अधिक तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!