बीडच्या जेलमध्ये चालते धर्मांतराचे रॅकेट! कारागृहामध्ये बायबलचे श्लोक, धर्मांतरासाठी लाखो रुपयांचे आमिष, गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक आरोप…


बीड : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बीडच्या कारागृहातील अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच त्यांनी दावा केला आहे की बीड जिल्हा कारागृहात धर्मांतराचे काम सुरू आहे.

कारागृहातून छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचे फोटो काढून टाकण्यात आले असून, त्यांच्या जागी बायबलमधील श्लोक लिहिण्यात आले आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.

पडळकर यांनी पुढे सांगितले की, बीडचे जे तुरुंग अधिकारी आहेत तिकडे ते धर्मांतराचं काम करत आहेत. तिकडे छत्रपती शिवाजी महाराज आणि गणपतीची मूर्ती होती, ती काढून टाकलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो, महात्मा गांधींचा फोटो काढून टाकलेला आहे.

       

ते सर्व फोटो एका खोलीत टाकलेले आहेत. जेलमध्ये सगळे बायबल मधले श्लोक लिहिले आहेत. कैदी जेलमध्ये भजन कीर्तन करायचे, ते भजन कीर्तन पूर्णपणे बंद करून टाकलेल आहे. तसेच कैद्यांना तुम्ही धर्मांतर करा तुम्हाला लाखो रुपये देतो अशा प्रकारची भूमिका तुरुंग अधिकारी घेत आहेत.

या प्रकरणाची सविस्तर माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली असून, पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन तपासाची मागणी केली आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून सीसीटीव्हीच्या आधारे चौकशी करावी आणि त्या अधिकाऱ्याला बडतर्फ करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!