Bhole Baba : ज्या बाबाच्या सत्संगमध्ये चेंगराचेंगरीत ११६ जणांचे जीव गेले, तो बाबा आहे कोण? महत्वाची माहिती आली समोर…
Bhole Baba : उत्तर प्रदेशच्या हाथरस याठिकाणी एक भयंकर दुर्घटना झाल्याचे समोर आले आहे. हाथरस जिल्ह्यातील सिकंदराबाद येथे भोले बाबा यांच्या प्रवचन कार्यक्रमात चेंगराचेंगरीची दुर्घटना झाली आहे.
बाबांच्या सत्संगाच्या या भव्य कार्यकमात घडलेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेने अनेक भक्तांचे बळी घेतले आहेत. या घटनेने नंतर एकच खळबळ उडाली आहे.
भोलेबाबाचं याआधी अनेकदा विविध वादांमध्ये नाव समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाबा १७ वर्ष पोलीस खात्यातील नोकरीत होते. नंतर व्हीआरएस घेवून अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. तर कोरोना काळात त्यांना ५० अनुयायी जमवण्याची परवानगी देण्यात आली होती.
मात्र प्रत्यक्षात ५० हजारांहून जास्त लोकं जमल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. भोलेबाबाचं मूळ नाव सूरज पाल आहे. भोले बाबांनी कासगंज जिल्ह्यातील पटियाला येथील एका छोट्या घरातून सत्संगची सुरुवात केली होती. Bhole Baba
आता या भोले बाबांचा प्रभाव हा पश्चिम युपीसह राजस्थान आणि मध्य प्रदेशपर्यंत आहे. भोले बाबा कधी एकेकाळी पोलीस खात्यात नोकरी करायचे. आता ते स्वत:ला परात्माचा चौकीदार असल्याचे सांगतात.
तर त्यांच्या असंख्य भक्तांचे म्हणणं आहे की, भोले बाबा हे देवाचे अवतारच आहेत. पण हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत निष्पापांच्या मृत्यूला हाच बाबा जबाबदार असल्याची चर्चा होत आहे.