भीमा पाटस कारखान्याबाबत संजय राऊत आक्रमक, आता फडणवीसांनी दखल न घेतल्याने सीबीआयला पत्र


दौंड : भीमा-पाटस सहकारी साखर कारखाना कथित घोटाळा प्रकरणाबाबत राऊत यांनी भाष्य केले आहे. याप्रकरणी आता राऊतांनी सीबीआयकडे तक्रार दिली आहे. यामुळे राहुल कुल यांची चौकशी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यासंदर्भात काही कागदपत्रेही राऊतांनी सादर करत घोटाळा झाल्याचे दावा केला आहे. राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

दरम्यान, भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्यात तब्बल ५०० कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा, राऊतांकाडून करण्यात आला आहे. याबाबत आपण उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्याचे राऊत यांनी सांगितले होते. आता यावरून पुन्हा एकदा फडणवीसांवर निशाणा साधत राऊतांनी सीबीआयकडे तक्रार दाखले केल्याचे सांगितले आहे.
संजय राऊत यांनी याबाबत ट्विट करून म्हटले आहे की, आपण या संदर्भात सीबीआयकडे तक्रार दाखल केली आहे. भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्यामध्ये ५०० कोटींचा घोटाळा झाल्याचे तक्रार मी केली आहे. फडणवीसांनी माझ्या तक्रारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. यामुळेच आता मी सीबीआयचे दार ठोठावले आहेत.