लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार पैसे, अजित पवारांनी यांचे मोठे विधान..


मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

गेल्या सात महिन्यांपासून महाराष्ट्रातील अनेक लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ देखील घेत आहे. २०२४ ते जानेवारी २५ पर्यंत अनेक महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा करण्यात आलेले आहे आणि म्हणूनच आता फेब्रुवारी महिन्याच्या कोणत्या तारखेला पैसे जमा होतील याची उत्सुकता देखील महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना लागलेली आहे.

अशातच यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. महिलांचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. लाडकी बहिण योजनवरुन आमच्यावर टीका केली जात आहे. ही योजना बंद होणार असे सांगतिले जात आहे.

पण येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार असल्याचं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळं लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे.

लाडकी बहिण योजनेबाबत अजित पवार यांना मोठं वक्तव्य केलं आहे. कालच मी ३ हजार ५०० कोटी रुपयांच्या चेकवर सही केली आहे. येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. एक रुपयात पिक विमा दिला मात्र त्याचे गैरप्रकार किती केले. गायरान जमीन शासकीय जमीन यावर पिक विमा काढण्यात आला आहे. कुठे फेडला हे पाप? योजनेचा योग्य फायदा घेतला पाहिजे असंही अजित पवार म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!