लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होणार, जानेवारीचे पैसे ‘या’ तारखेला येणार खात्यात, जाणून घ्या..

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. अशाप्रकारे आता डिसेंबर २०२४ पर्यंत सरकारने महिलांच्या खात्यात ९००० रूपये जमा केले आहेत.

जानेवारीमध्ये महिलांच्या खात्यात सातवा हप्ता मिळणार आहे.हे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यासाठी सरकार संक्रातीचा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होणार आहे.
आता नवीन वर्षात जानेवारी महिना उजाडला आहे. आणि महिलांना त्यांच्या नवीन हप्त्याची प्रतिक्षा लागली आहे. पण तो किती तारखेला महिलांच्या खात्यात जमा होणार आहे, याची अद्याप तरी माहिती मिळू शकलेली नाही.पण राज्य सरकार लाडक्या बहिणींना गोड बातमी देण्याच्या तयारीत आहे.

गोड यासाठी कारण सरकार सातव्या हप्त्यासाठी मकरसंक्रातीचा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे. सरकार महिलांना मकरसंक्रातीच्या मुहूर्तावर पैसे पाठवणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळ १४ जानेवारीला मकरसंक्रात आहे.
दरम्यान, याच मकरसंक्रातीच्या मुहूर्तावर सरकार लाडकी बहीणचे पैसे पाठवणार असल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे या मुहूर्तावर जर खरंच सरकारच्या खात्यात पैसे आले तर लाडक्या बहिणींची संक्रात आणखीण गोड होणार आहे.