बीड पुन्हा हादरले! बलात्कार करतोस का? म्हणत भाजप पदाधिकाऱ्याची भरदिवसा धारदार शस्त्राने हत्या..


बीड : बीड पु्न्हा एकदा हादरलं आहे. बीडमधील माजलगाव शहरात भर दुपारी एकाने भाजप पदाधिकाऱ्याची सपासप वार करुन हत्या केली. बलात्कार करतोस का, असा संतप्त जाब विचारत भाजप पदाधिकाऱ्याला संपवलं. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

आरोपीने स्वत: पोलीस ठाण्यात सरेंडर केले आहे. बाबासाहेब प्रभाकर आगे (वय. ३४) असे मृत झालेल्या भाजप पदाधिकाऱ्याचे नाव आहे. तर, नारायण शंकर फपाळ (वय.३८) असे आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, माजलगाव बसस्थानकापासून जवळच असलेल्या भाजप कार्यालयात भाजपचे तालुका सरचिटणीस व बीड जिल्हा लोकसभेचे विस्तारक असलेले बाबासाहेब आगे आपल्या साथीदारांसह बसले होते.

त्यानंतर दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास आगे कार्यालयातून बाहेर पडले. त्यानंतर दबा धरून बसलेला नारायण फपाळ याने हल्ल्याचा प्रयत्न केला. आपला जीव वाचवण्यासाठी आगे यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने त्याचा पाठलाग केला.

जवळच असलेल्या एकाच्या घराच्या दिशेने आगे ‘वाचवा, वाचवा’ म्हणून पळत गेले. पण पाठीमागून आलेल्या नारायणने बाबासाहेब यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. यात बाबासाहेबांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, आरोपी नारायण फपाळ याने बाबासाहेब आगे याच्यावर वार करताना बलात्कार करतोस का, असे म्हणत वार केला होता. या घटनेनंतर बाबासाहेब आगे यांच्या एका महिलेच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सुरू झाली.

भाजप पदाधिकारी असलेल्या बाबासाहेबांचे किट्टी आडगाव येथे एका महिलेशी प्रेम प्रकरण अनेक वर्षांपासून होते. याचीच कुणकुण नारायणला लागली होती. आरोपी नारायण याने अनेकदा आगे यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण, त्याने दुर्लक्ष केले होते, अशी माहिती समोर आली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!