Beed News : बीड हादरले! विवाहितेवर पतीसह सासऱ्याचा अनैसर्गिक अत्याचार, घटनेने उडाली खळबळ..


Beed News बीड : बीडमधून अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहे. गुप्तधन काढण्यासाठीच्या पूजेला बसण्याचा विरोध केल्यानंतर एका महिलेवर पतीसह सासऱ्याने अनैसर्गिक अत्याचार केला आहे. Beed News

याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पीडितेचा पती, सासरा, नणंद, नंदावा यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार व जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींना अटक देखील केली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, आरोपींनी गुप्तधन काढण्यासाठी घरात पूजा मांडली होती. या पूजेला बसण्यासाठी आरोपींनी पीडितेला आग्रह केला. मात्र, या गोष्टीला पीडित महिलेने विरोध केला. त्यामुळे पती आणि सासऱ्यांनी तिला बेदम मारहाण केली.

आरोपी इतक्यावरच थांबले नाही, तर त्यांनी पीडित महिलेचे हातपाय बांधले. तसेच तिच्या तोंडात बोळा कोंबून अनैसर्गिक अत्याचार केला. या संपूर्ण प्रकारानंतर पीडित महिलेने पोलिसांत धाव घेत आपल्यासोबत घडलेला प्रकार पोलिसांसमोर कथन केला

दरम्यान, पोलिसांनी आरोपींना अटक केली असून या घटनेचा पुढील पोलीस करीत आहेत. या घटनेने परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!