Beauty Tips : महिलांनो चेहऱ्यावरील सौंदर्य राखा फेसमास्कने, अशा प्रकारे तयार करा फेसमास्क, जाणून घ्या..


Beauty Tips उरुळीकांचन : सौंदर्य प्रसाधनात सर्वात जास्त वापरले जाणारे उत्पादन आहे फेशियल मास्क. ते रोमछिद्रे साफ करते व मृतत्वचा हटवते. त्वचा तुकतुकीत व उजळ बनवते. बहुतेक फेसमास्क फळांपासून व भाज्यांपासून तयार केलेले असतात.

फेसमास्क वापरताना आपला चेहरा स्वच्छ असावा. त्यावर कोणताही मेकअप नसावा. त्वचा रुक्ष असेल तर ओल्या कापडाने आपला चेहरा स्वच्छ पुसून घ्यावा. यामुळे रोमछिद्रे उघडतात व फेसमास्क जास्त प्रभाव टाकेल. पण जर त्वचा तेलकट असेल तर असे करू नये. कारण त्यामुळे मुरमे होऊ शकतात. फेसमास्क लावण्यापूर्वी केस व्यवस्थित मागे बांधून घ्यावेत. Beauty Tips

फेसमास्क तयार करण्याची व वापरण्याची पद्धत :

त्वचेवर उजाळा आणण्यासाठी मलईत थोडीशी हळद मिसळा व १५ ते ३० मिनिटे लावून ठेवा व नंतर कोमट पाण्याने धुवा. तेलकटपणा नाहीसा होईल. जर आपली रोमछिद्रे उघडी असतील तर क्लेमास्क ती मिटवील व त्वचेला टवटवी देईल. मुलतानी मातीत थोडीशी मलई मिसळा व त्वचेवर लावून बाळू द्या. नंतर पाण्याने चेहरा साफ करा. टोमॅटोही रोमछिद्रांसाठी उत्तम असते.

रूक्ष त्वचेसाठी फेसमास्क
एक चमचा मध व एक चमचा अंड्यातील पांढरा भाग मिसळून चेहऱ्यावर लावा व वाळल्यानंतर धुऊन टाका.
एक चमचा अंड्याचा पिवळा भाग घ्या. त्यात मध व ऑलिव्ह ऑइलचे काही थेंब मिसळा व चेहऱ्यावर लावा. जर आपली त्वचा जास्त रुक्ष असेल तर लिंबू व संत्रे वापरू नका.
एक चमचा मलईत थोडेसे बेसन, हळद व दूध टाकून पेस्ट बनवा. ती चेहऱ्यावर लावून सुकल्यानंतर धुवून टाका.

तेलकट त्वचेसाठी फेसमास्क…
काकडी किसून त्यात दही मिसळून पेस्ट बनवून घ्या व १५ मिनिटे चेहऱ्यावर लावा. नंतर पाण्यात गुलाबपाणी मिसळून लेप तयार करून चेहऱ्यावर लावा. मास्क सुकल्यानंतर कोमट पाण्याने साफ करून घ्या.
अंड्यातील पांढऱ्या भागाचा मास्क ही उघडी रोमछिद्रे बंद करतो. हादेखील तेलकट त्वचेसाठी लाभप्रद असतो.
काकडी किसून त्यामध्ये लिंबाचा वा संत्र्याचा रस मिसळून तो चेहऱ्यावर लावावा.

मिश्र त्वचेसाठी फेसमास्क
एक चमचा बेसनामध्ये चिमुटभर हळद, काही थेंब बदाम रोगन टाकून पेस्ट तयार करा व चेहऱ्यावर लावा. सुकल्यानंतर चेहरा थंड पाण्याने साफ करा.
■ एक चमचा बेसनात काही थेंब ग्लिसरिन व लिंबाचा रस मिसळून लावा व १०-१५ मिनिटांनंतर पाण्याने चेहरा साफ करून घ्या.
■ एक चमचा ओटमीलमध्ये एक चिमूट हळद, एक चमचा बेसन व ग्लिसरीन मिसळून चेहऱ्यावर लावा व १५ मिनिटांनंतर चेहरा धुवा.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!