मुलांना गाडीत बसवताना काळजी घ्या, चिमुकले फिरायला गेले, पालकांचे दुर्लक्ष झाले अन्…


नागपूर : नागपूरमध्ये पालकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी बातमी समोर आली आहे. येथील टेकानाका परिसरातील ही घटना तौफीक फिरोज खान हा ४ वर्षे वयाचा मुलगा, सहा वर्षांची त्याची बहिण आलिया फिरोज खान व आफरीन इर्शाद खान ही सहा वर्षे वयाची मुलगी हे तिघेजण फारुकनगर ग्राऊंडवर खेळायला गेली.

त्यांना संध्याकाळ उशीर झाला, तरी मुले आली नाहीत आणि पालकांची चिंता वाढली. पालकांनी शोधाशोध सुरू केली. मग पोलिसांतही तक्रार दिली. पोलिसांनी तक्रार दाखल करून परिसरातील सीसीटिव्ही तपासायला सुरवात केली.

२४ तासांनंतरही मुले काही सापडेनात. ही मुले लहान असल्याने फार दूर गेली नसतील याची खात्री पोलिसांनाही होती. पण रविवारी रात्री आठ वाजता सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला.

घराबाहेर खेळण्यासाठी गेलेली दोन भावंडे व त्यांची एक लहान मैत्रिण तिघेही एका गाडीच्या डिकीत खेळण्यासाठी गेले होते. डिकी लावून घेताच सध्याचा उन्हाळा व डिकीतून ऑक्सिजन मिळत नसल्याने ती मुले गुदमरून गेली होती.

ही मुले सापडताच त्यांना दवाखान्यात नेण्यात आले, मात्र त्यांचा अगोदरच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. डिकीमध्ये गेल्यानंतर डिकी उघडता न आल्याने ही मुले गुदमरून मृत पावली. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!