Bareilly News : सगळी तयारी झाली होती, नवरी सजून धजून वरातीची वाट बघत होती, पण नवरा तर बहिणीसोबत….


Bareilly News : लग्नाच्या एक दिवस होणारा नवरा मुलगा त्याच्या आत्तेबहिणीसोबत पळू गेला. उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात हा विचित्र प्रकार घडला आहे. वधूच्या कुटुंबियांना हा प्रकार समजताच त्यांच्या डोक्यात संतापाची तिडीकच गेली. संतापाच्या भरातच ते वराच्या घरी पोहोचले आणि एकच गोंधळ माजला.

त्यानंतर गावात पंचायत बोलवून अखेर दीड लाख रुपयांवर तोडगा काढण्यात आला. सध्या पोलिसांनी पळून गेलेला तरुण आणि तरुणीला ताब्यात घेतले असून अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करून आरोपींविरुद्ध चालान जारी केले आहे. हे संपूर्ण प्रकरण भोजीपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. Bareilly News

तेथील गावातील एक व्यक्तीने आरोप केला काही त्याच्या बहिणीचे लग्न शिशगढ पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील तरुणासोबत ठरले होते. लग्न अवघे एका दिवसावर आले होते, दुसऱ्या दिवशी घरी वरात येणार होती. पण लग्नाच्या एक दिवसाआधीच होणारा नवरा त्याच्या आत्याच्या मुलीसोबत पळून गेला. ती त्याच्याच गावात राहणारी होती.

जिचं लग्न ठरलं होतं, त्या वधूच्या घरच्यांनी त्यांच्या होणाऱ्या जावयाच्या घरी आधीच काही पैसे आणि बाईक दिली होती. लग्नाची सगळी खरेदीही झाली. सगळी तयारी पूर्ण होती. नातेवाईकांसाठी जेवणाची व्यवस्था, मोठ्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

पण लग्नापूर्वीच होणारा नवरा दुसऱ्या मुलीसोबत पळाल्याने सगळेच संतापले. चिडलेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाचे घर गाठून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. नवरा मुलगा ज्या बहिणीसोबत पळून गेला, तिचा आधीच विवाह झाला होता. मात्र पतीसोबत वाद झाल्यानंतर ती माहेरी राहत होती. ती बेपत्ता झाल्यावर तिच्या कुटुंबीयांनी भोजीपुरा पोलिसांत तक्रार केली. अखेर पोलिसांनी त्या दोघांना पकडले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!