Baramati News : ३५ लाखांची वीजचोरी, रक्कम भरल्याशिवाय वीजपुरवठा होणार नाही, बारामतीच्या पवारांना न्यायालयाचा दणका…


Baramati News : सध्या वीज चोरीच्या घटना वाढत असून आता सासवड येथील साईनाथ आईस फॅक्टरीला वीजचोरी प्रकरणात ३५ लाख ३६ हजारांचा दंड झाला होता. आता हा दंड भरल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत करता येणार नसल्याचे जिल्हा न्यायालयाने म्हटले आहे.

यामुळे आता साईनाथ आईस फॅक्टरीचा वीज पूर्ववत जोडून देण्याचा अर्ज फेटाळून लावला आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. या घटनेमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत. या फॅक्टरीची वीजचोरी काही महिन्यांपूर्वी उघडकीस आली होती. Baramati News

यामुळे या फॅक्टरीला २ लाख ३४ हजार २४३ युनीटची चोरी केल्याबद्दल ३५ लाख ८६ हजारांचा दंड झाला होता. याबाबत साईनाथ फॅक्टरीचे मालक नारायण दगडू पवार यांनी दिवाणी न्यायालयात अर्ज केला होता.

असे असताना मात्र, दिवाणी न्यायालयाने बिल कायम ठेवले. त्यांनतर पवार यांनी जिल्हा न्यायालयात दाद मागितली. यामध्ये आरोपीला काही काळ अटक सुद्धा झाली होती. यामुळे हे प्रकरण चांगलेच गाजले होते.

नंतर जिल्हा न्यायालयातही महावितरणने आकारलेला दंड भरावाच लागेल. दंडाची रक्कम भरल्याशिवाय वीजपुरवठा जोडून देता येणार नसल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. यामुळे आता ही रक्कम भरावीच लागणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!