Baramati Lok Sabha : सुप्रिया सुळे यांच्यावर सुनेत्रा आणि पार्थ पवारांचे ५५ लाखांचे कर्ज, उमेदवारी अर्जात नेमकं काय?


Baramati Lok Sabha : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या रंजक घडामोडी सुरु आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर अजित पवार गटाकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरल्या आहेत.

नणंद विरुद्ध भावजय या संघर्षाकडे राज्याचं लक्ष लागले आहे. सुप्रिया सुळे यांनी अर्ज दाखल केला असून सुनेत्रा पवारसुद्धा अर्ज भरणार आहेत. महायुतीची पुण्यात आज सभा आहे. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी दाखल केलेल्या अर्जात त्यांनी संपत्तीबाबत शपथपत्र जोडलं आहे. यामध्ये सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यावर असलेलं कर्ज आणि उपन्नाची माहिती दिली आहे.

आज सुप्रिया सुळे यांनी प्रचंड शक्तिप्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा निवडून येण्याचा निर्धार व्यक्त केला. सुप्रिया सुळे यांच्यावर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार यांचे ५५ लाखांचे कर्ज आहे. तर सुप्रिया सुळे यांचे यंदा शेतीचे उत्पन्न शून्य रुपये असल्याचंही शपथपत्रातील माहितीमधून समोर आली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवार म्हणून मी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहे. Baramati Lok Sabha

या निवडणूकीचा उमेदवारी अर्ज आज विधान भवन येथे आदरणीय पवार साहेब व त्यांच्यावर नितांत प्रेम करणारी जनता, महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या साक्षीने दाखल केला.

आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेचे आशीर्वाद, शुभेच्छा, अतूट विश्वास आणि भरघोस पाठबळ यांच्या जोरावर मला पुन्हा या मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळेल हा विश्वास आहे.

मायबाप जनतेची सेवा, महिला, शेतकरी, कष्टकरी, कामगार यांचा सन्मान आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान कायम बुलंद राखण्यासाठी मी लढत आहे. या लढतीत मायबाप जनता माझ्या सोबत राहिल याची मला खात्री आहे असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!