Baramati : रणजित निंबाळकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी गौतम काकडेला अटक, आता बैलाच्या व्यवहाराची माहिती येणार समोर…
Baramati : शर्यतीचा बैल खरेदीकरण्याच्या वादातून बारामतीतील निंबुत येथे गोळीबार झाल्याची घटना घडलेली. या घटनेत गोळीबारात जखमी झालेल्या फलटणच्या रणजीत निंबाळकर यांचा मृत्यू झाला.
गोळीबारानंतर फरार झालेला मुख्य आरोपी गौतम काकडे पोलिसांनी शिताफीने पकडला. गौतम काकडेला अटक करण्यात आली असून, या प्रकरणात आपर्यंत गौतम काकडे सह गौतम काकडे चा भाऊ गौरव काकडे व वडील शहाजी काकडे या तिघा जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे.
निंबूत येथील गोळीबारात जखमी झालेल्या फलटणच्या रणजीत निंबाळकरांची जगण्याची लढाई शनिवार (ता.२९) अडीच वाजता संपली. त्यानंतर रणजीत निंबाळकरांचे चाहते, त्यांचे नातेवाईक व निकटवर्तीय यांनी काल सकाळी वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे गाठले.
याच पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल आहे, मात्र गौतम काकडेला अजून अटक करण्यात आलेली नसल्याने गौतम काकडेला अटक करा, आमचा बैल आमच्या ताब्यात द्या, अन्यथा आम्ही गौतम काकडे च्या घरासमोरून हलणार नाही असा इरादा व्यक्त करत गर्दी वाढू लागल्याने तणाव निर्माण झाला होता. Baramati
त्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची पथके, त्याचबरोबर बारामती पोलिसांची पथके,वडगाव निंबाळकर पोलिसांची पथके गौतम काकडेच्या मागावर होती. गौतम काकडे कोठे आहे. या संदर्भात तपास युद्धपातळीवर सुरू होता. काल रात्री उशिरा गौतम काकडेला ताब्यात घेऊन पोलिसांनी अटक केली.
दरम्यान या घटनेत पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. गौरव काकडे यास अटक केली आहे, तर सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे यांना देखील अटक करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण गुन्ह्यांमध्ये सहा जणांचा समावेश झाला होता.
घटना घडल्यापासून गौतम काकडे हा फरारी होता. मात्र पोलिसांनी आज त्याला अटक केली आहे. आता या घटनेतील सीसीटीव्ही फुटेज तसेच रिव्हॉल्व्हर आणि त्याविषयीची अन्य माहिती पोलीस तपासात निष्पन्न होईल.