Baramati : पुण्याच्या ग्रामीण भागात ड्रोन उडत आहेत, पोलीस अधिकारी म्हणाले, काळजी करू नका, अफवांवर विश्वास ठेऊ नका, ते ड्रोन नसून…

Baramati : हवेत उडणारे ड्रोन लोकांच्या काळजीचा विषय बनले आहेत आणि हळूहळू आता तर ते चिंतेचा विषय बनू लागले आहेत. कारण पुणे जिल्ह्यात तर अधिकच चिंतेचा विषय बनला आहे. सामाजिक स्वास्थ या तथाकथित ड्रोनमुळे बिघडू लागले आहे.

बारामती तालुक्याच्या शेवटच्या परिसरात असलेल्या सोमेश्वर नगर ते इंदापूरच्या निरा नरसिंहपूरपर्यंत आणि इंदापूरच्याच अगोतीपासून दौंड तालुक्याच्या यवतपर्यंत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ड्रोन उडत असल्यावर वरून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

अशातच आता काल अखेर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील पोलीस अधीक्षकांना या संदर्भात सूचना करत खरं काय ते शोधण्याची आवाहन केले आहे पण आत्तापर्यंत जिथून जिथून अशा अफवा आल्या त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चोरी झाली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

या संदर्भात बारामती शहर पोलिसांनी लोकांना आवाहन केले आहे की जे ड्रोन म्हणून आपल्याला उडताना दिसत आहेत, ते ड्रोन नसून रात्रीच्या वेळी उडणारी प्रशिक्षित विमाने आहेत. Baramati
बारामती शहर पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनानुसार आज संध्याकाळी अनेक ठिकाणाहून आकाशात ड्रोन उडत असल्याबाबत फोन येत आहेत. यामध्ये बहुतांश ट्रेनिंग विमान आहेत, जी रात्रीचा सराव करत आहेत. याबाबत आम्ही विमान कंपनीची चर्चा करत आहोत आणि त्यानंतर सविस्तर माहिती देणार आहोत.
नागरिकांनी विनाकारण अफवा पसरवू नये. कोणीही अफवांवर विश्वासही ठेवू नये. ड्रोनद्वारे कुठेही चोरी किंवा सर्वेचा कोणताही प्रकार अद्याप घडल्याचे निदर्शनास आलेले नाही.
नागरिकांनी भिऊ नये, जर काहीशंका असेल तर आमच्याशी संपर्क साधावा आम्ही याबाबत खात्री करत आहोत असे बारामतीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
