Baramati Crime : ब्रेकिंग! बारामतीत शर्यतीच्या वादातून गोळीबारात एकाचा मृत्यू, कारखान्याच्या माजी अध्यक्षांना अटक….


Baramati Crime : शर्यतीचा बैल खरेदीकरण्याच्या वादातून बारामतीतील निंबुत येथे गोळीबार झाल्याची घटना घडलेली. या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू होती. मात्र, उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

याप्रकरणी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे आणि त्यांचा मुलगा गौरव काकडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. 

काल रात्री अकराच्या सुमारास गौतम शहाजी काकडे यांच्या घरी निंबूत येथे बैलाच्या पैशाच्या व्यवहारावरून गौतम काकडे यांचा भाऊ गौरव याने फलटण येथील सुंदर बैलाचे मालक रणजीत निंबाळकर यांच्यावर गोळी झाडली.

गोळी डोक्यात गेल्याने निंबाळकर हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना सुरुवातीला बारामती येथे व त्यानंतर पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या संदर्भात अंकिता रणजीत निंबाळकर स्वामी विवेकानंद नगर फलटण यांनी फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये गौतम शहाजी काकडे, गौरव शहाजी काकडे व तीन अनोळखी व्यक्तींविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र आता या घटनेतील जखमी निंबाळकरांचे निधन झाल्याने हा गुन्हा आता खुनाचा गुन्हा म्हणून रूपांतरीत होईल. Baramati Crime

शर्यतीचा बैल खरेदी करण्याच्या व्यवहारातून उद्भवलेल्या वादातून गोळीबार झाला. या गोळीबारात रणजीत निंबाळकर हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. या संदर्भात अंकिता रणजीत निंबाळकर यांनी फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये गौतम शहाजी काकडे, गौरव शहाजी काकडे आणि तीन अनोळखी व्यक्तींविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या फिर्यादीनुसार एक वर्षांपूर्वी सर्जा हा बैल निंबुत येथील गौतम काकडे यांच्याकडून ६१ लाख रुपयांना रणजित निंबाळकर यांनी विकत घेतला होता. त्यानंतर २४ जून २०२४ रोजी रणजीत निंबाळकर यांच्याकडील सुंदर नावाचा बैल गौतम शहाजी काकडे यांनी ३७ लाख रुपयांना विकत घेतला. यावेळी गौतम काकडे यांनी विसारापोटी पाच लाख रुपये दिले होते.

उर्वरित ३२ लाख रुपये येणं बाकी होते. दरम्यान, व्यवहार झाला, त्याच दिवशी गौतम काकडे यांनी सुंदर हा बैल खटाव तालुक्यातील बुध येथून त्यांच्या घरी निंबुतला नेला. उर्वरित पैसे आणण्यासाठी गेले असताना त्यांच्यामध्ये वाद झाला आणि त्यावरून रणजीत निंबाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला.

दरम्यान, पण्यातील खाजगी दवाखान्यात रणजीत निंबाळकर यांना दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले, मात्र आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत .

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!