गणेशोत्सव, नवरात्र अन् ईद, सप्टेंबरमध्ये 15 दिवस बँका राहणार बंद, वाचा सुट्ट्यांची संपूर्ण यादी…

पुणे : ऑगस्ट महिना संपत आला आहे. नवा महिना जवळ आला की त्यात किती सुट्ट्या आहेत, किती दिवस बँका बंद राहणार याची सर्वसामान्यांना उत्सुकता असते. सप्टेंबर महिन्यातही बरेच सणवार, उत्सव असल्याने त्याची सुट्टी असणार का याचीही उत्सुकता असते.

सप्टेंबर महिन्यात ओणम, ईद-ए-मिलाद आणि नवरात्र येत आहेत, यामुळे सप्टेंबर महिन्यात तब्बल 15 दिवस बँकांना सुट्ट्या असणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातर्फे प्रत्येक महिन्यातील बँकांना असलेल्या सुट्टीचे कॅलेंडर प्रसिद्ध करण्यात येते.
दरम्यान, या कॅलेंडरनुसार, सप्टेंबर महिन्यात देशभरातील बँका एकूण 15 दिवस बंद राहणार आहेत. यामध्ये आठवड्याच्या सुट्ट्या आणि सणांमुळे मिळणाऱ्या प्रादेशिक सुट्ट्यांचा समावेश आहे.

बँक सुट्ट्यांची यादी…
३ सप्टेंबर – कर्म पूजा (रांची, पाटणा)

४ सप्टेंबर – पहिला ओणम (त्रिवेंद्रम, कोची)
५ सप्टेंबर – ईद-ए-मिलाद / मिलाद-उन-नबी / तिरुवोनम / मिलाद-ए-शरीफ (दिल्ली, मुंबई, लखनौ आणि इतर शहरे)
6 सप्टेंबर – ईद-ए-मिलाद (जम्मू, श्रीनगर, गंगटोक)
7 सप्टेंबर – रविवार
12 सप्टेंबर – ईद-ए-मिलाद नंतर शुक्रवार (जम्मू, श्रीनगर)
13 सप्टेंबर – पहिला शनिवार
14 सप्टेंबर – रविवार
21 सप्टेंबर – रविवार
22 सप्टेंबर – नवरात्री स्थापना (जयपूर)
23 सप्टेंबर – महाराजा हरिसिंह जयंती (जम्मू)
27 सप्टेंबर – दुसरा शनिवार
सप्टेंबर 28 – रविवार
29 सप्टेंबर – महासप्तमी / दुर्गा पूजा (कोलकाता, गुवाहाटी, श्रीनगर)
३० सप्टेंबर – महाअष्टमी / दुर्गा पूजा (कोलकाता, त्रिपुरा, भुवनेश्वर आणि इतर ठिकाणी)