Bank holiday : दसरा-दिवाळी ते नवरात्र, ऑक्टोबर महिन्यात चक्क एवढ्या दिवस बँका बंद, करून घ्या महत्वाची कामे…
Bank holiday : सप्टेंबर महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. आता लवकरच ऑक्टोबर महिन्याला सुरुवात होईल. ऑक्टोबर महिन्यात अनेक सण येत आहेत. गांधी जयंती पासून ते दसऱ्यापर्यंत अनेक मोठे सण या महिन्यात येतील.
त्यामुळे बँकांना अनेक दिवस सुट्ट्याही असतील. या महिन्यात तब्बल १५ दिवस बँका बंद असणार आहेत. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात तब्बल कोणत्या दिवशी बँका बंद असतील, हे जाणून घेऊ या… Bank holiday
ऑक्टोबर महिन्यात कोणकोणत्या दिवशी बँका असतील बंद?
१ ऑक्टोबर – विधानसभा निवडणुकीमुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये बँका बंद असतील.
२ ऑक्टोबर- महात्मा गांधी यांच्या जयंतीमुळे संपूर्ण देशात बँका बंद असतील.
३ ऑक्टोबर- नवरात्रीमुळे जयपूरमध्ये बँका बंद असतील.
६ ऑक्टोबर- रविवार असल्यामुळे संपूर्ण देशातील बँका बंद असतील.
१० ऑक्टोबर- दुर्गा पूजा, दसर, महासप्तमी यामुळे अगरताळा, गुवाहाटी, कोलकाता, कोहिमा येथील बँका बंद असतील.
११ ऑक्टोबर- दसरा, महाअष्टमी, महानवमी, आयुध पूजा, दुर्गा पूजा, दुर्गा अष्टमी, यामुळे अगरताळा, बंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, इम्फआळ, ईटानगर, कोहिमान, कोलकाता, पाटणा, रांची, शिलाँग या भागात बँका बंद असतील.
१२ ऑक्टोबर- विजयदशमी, दुर्गा पूजा यामुळे पूर्ण देशात बँका बंद असतील.
१३ ऑक्टोबर- रविवारमुळे संपूर्ण देशात बँका बंद असतील.
१४ ऑक्टोबर- दुर्गा पूजेमुळे गंगटोक येथील बँका बंद असतील.
१६ ऑक्टोबर- लक्ष्मी पूजामुळे अगरताळा कोलकाता येथे बँका बंद असतील.
१७ ऑक्टोबर- महर्षी वाल्मीकी यांच्या जयंतीनिमित्त बंगळुरू, गुवाहाटी येथे बँका बंद असतील.
२० ऑक्टोबर- रविवार असल्यामुळे संपूर्ण देशातील बँका बंद असतील.
२६ ऑक्टोबर- चौथा शनिवार असल्यामुळे संपूर्ण देशातील बँका बंद असतील.
२७ ऑक्टोबर- रविवार अशल्यामुळे संपूर्ण देशातील बँका बंद असतील.
३१ ऑक्टोबर- दिवाळीनिमित्त संपूर्ण देशातील बँका बंद असतील.