Bank holiday : डिसेंबर महिन्यात १७ दिवस बंद राहणार बँक, नेमक्या कोणत्या दिवशी सुट्ट्या आहेत पाहा यादी…

Bank holiday : वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये अर्ध्याहून अधिक दिवस बँका बंद राहणार आहेत. आरबीआय बँक हॉलिडे कॅलेंडरनुसार, देशातील विविध राज्यांमध्ये एकूण १७ बँक सुट्ट्या असतील. RBI प्रत्येक महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर करते. डिसेंबर महिन्यात मुंबईसह महाराष्ट्रात कोणत्या दिवशी बँक बंद राहणार आहे जाणून घेऊया.
डिसेंबर महिन्यात देशातील बँका १७ दिवस बंद राहणार आहेत. राष्ट्रीय आणि स्थानिक सणांमुळे अनेक बँकांना सुट्ट्या असतील. डिसेंबरमधील ७ दिवसांच्या सुट्टीमध्ये शनिवार व रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश होतो. पुढील महिन्यात ५ रविवार येणार आहेत, त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांना ५ दिवसांऐवजी ७ दिवसांची साप्ताहिक रजा मिळणार आहे
राज्यनिहाय बँक सुट्टीची यादी…
१ डिसेंबरला रविवार असल्याने देशातील सर्व बँका बंद राहणार आहेत
३ डिसेंबर रोजी गोव्यात सेंट फ्रान्सिस झेवियरच्या सणाच्या निमित्ताने बँका बंद राहतील
८ डिसेंबर (रविवार) रोजी देशातील सर्व बँका बंद राहणार आहेत
१२ डिसेंबर रोजी मेघालयमध्ये पा-तोगन नेंगमिंजा संगमा निमित्त बँका बंद राहतील
१४ डिसेंबर दुसऱ्या शनिवारमुळे देशातील सर्व बँका बंद राहणार आहेत
१५ डिसेंबर (रविवार) रोजी देशातील सर्व बँका बंद राहणार आहेत
१८ डिसेंबर रोजी मेघालयमध्ये यू सोसो थामच्या पुण्यतिथीनिमित्त बँका बंद राहतील
१९ डिसेंबर रोजी गोवा मुक्ती दिनानिमित्त गोव्यात बँका बंद राहणार आहेत
२२ डिसेंबरला (रविवार) असल्याने देशातील सर्व बँका बंद राहणार आहेत
२४ डिसेंबर मिझोराम, नागालँड आणि मेघालयमध्ये नाताळच्या पूर्वसंध्येला बँका बंद राहतील
२५ डिसेंबर रोजी ख्रिसमसच्या निमित्ताने संपूर्ण भारतात बँका बंद राहतील
२६ डिसेंबर रोजी मिझोराम, नागालँड आणि मेघालयमध्ये ख्रिसमसच्या निमित्ताने बँका बंद राहतील
२७ डिसेंबर नागालँडमध्ये नाताळच्या सणानिमित्त बँका बंद राहतील
२८ डिसेंबर रोजी चौथा शनिवार असल्याने देशातील सर्व बँका बंद राहणार आहेत
२९ डिसेंबर (रविवार) रोजी देशातील सर्व बँका बंद राहणार आहेत
३० डिसेंबर (सोमवार) रोजी मेघालयमध्ये U Kiang Nangbah निमित्त बँका बंद राहतील
३१ डिसेंबर (मंगळवार) मिझोराम आणि सिक्कीममध्ये नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला/लोसॉन्ग/नामसाँगच्या निमित्ताने बँका बंद राहतील