बांगलादेशी महिलांची पुण्यात घुसखोरी करत बुधवार पेठेत वेश्याव्यवसाय, 8 जणींना अटक, धक्कादायक माहिती आली समोर…

पुणे : शहरातील बुधवार पेठेत एक मोठी कारवाई पोलिसांनी केली. पोलिसांनी विशेष मोहिमेअंतर्गत आठ बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले आहे. त्या याठिकाणी अधिकृतपणे वास्तव्य करत होत्या. पोलिसांना बुधवार पेठेत बांगलादेशी महिला अनधिकृतपणे राहत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.
माहितीच्या आधारे फरासखाना ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखालील तपास पथक आणि अँटी-टेररिस्ट सेलने संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. या सर्व महिलांवर विदेशी नागरिक कायदा आणि कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत.
चौकशीत या महिलांनी आपण बांगलादेशातून बेकायदेशीरपणे भारतीय सीमेत प्रवेश केल्याचे कबूल केले आहे. पुणे पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात अनधिकृतपणे राहणाऱ्या परदेशी नागरिकांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यामुळे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात बांगलादेशी घुसखोरांविरोधात विविध पातळ्यांवर कारवाई सुरू आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून, फरासखाना रात्री या पथकाने अचानक छापा टाकून संबंधित आठ महिलांना ताब्यात घेतले. त्या याठिकाणी वेश्या व्यवसाय करत असल्याचे देखील सांगितले जात आहे.
दरम्यान, या महिला भारतात बेकायदेशीररित्या राहत होत्या आणि येथे वेश्याव्यवसायात सहभागी असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे. पुण्यात आल्यानंतर त्यांनी स्वतःला पश्चिम बंगालचे रहिवासी भासवून, ‘रेड लाईट’ परिसरात वेश्याव्यवसाय करत होते. अशा अनेक महिला महाराष्ट्रात असल्याचे सांगितले जात आहे.