प्री-वेडिंग शूटिंगवर बंदी! आता ‘या’ समाजाने घेतला बंदीचा निर्णय


पुणे : सध्या सगळीकडे लग्नाच्या अगोदर एखाद्या चित्रपटासारखी प्री वेडिंग शूटिंग करण्याची पद्धत समाजात सुरु झाली आहे. त्याला आता आवर घालण्याची प्रक्रिया समाजात सुरू झाली आहे.

मराठा समाजातील मुला-मुलींचे विवाह करताना प्री-वेडिंग शूटिंग करू नये, असा निर्णय काही दिवसांपूर्वीच मराठा, जैन समाजातील काही संघटनांनी या संदर्भात निर्णय घेतला असतानाच, आता काल पांचाळ सोनार समाजाच्या वतीने देखील अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे

पांचाळ सोनार महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष धनंजय क्षीरसागर व महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पोतदार यांनी याची माहिती दिली. महामंडळाच्या ऑनलाईन झालेल्या बैठकीत अध्यक्षांच्या सूचनेनुसार याचा ठराव करण्यात आला असून, राज्यभरातील पांचाळ सोनार समाजाने या निर्णयाचे स्वागत केले आहे.

सांगलीत बैठक झाली, मात्र त्याचे पडसाद बारामती इंदापूर तालुक्यातील उमटले असून, इंदापूर तालुक्यातील सणसर येथील पांचाळ सोनार समाजाने या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!