नाना पटोले यांच्याबरोबर काम करू शकत नाही…!

बाळासाहेब थोरातांचा बंडाचा इशारा, नाना पटोलेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात ?


अहमदनगर : नाशिक पदवीधरच्या निवडणुकीपासून काँग्रेसमध्ये सुरु असलेला वाद अजून संपण्याचे नाव घेत नाही. तांबे ,पटोले वादात आत्तापर्यंत शांत असलेले बाळासाहेब थोरात यांनी प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे काँग्रेसमधील बेदिली अधिक ठळकपणे समोर आली आहे.

काँग्रेसने सत्यजित तांबे यांच्याबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे अनेकजण नाराज आहेत. आता खुद्द काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. “विधानपरिषद निवडणूक दरम्यान जे काही घडलं, जे राजकारण झालं ते व्यथीत करणारं होतं, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. यावेळी थोरातांनी एकीकडे सत्यजित तांबे यांचे विजयाबद्दल अभिनंदन करताना दुसरीकडे नाना पटोलेंची हायकमांडकडे तक्रार केली आहे. विधान परिषद निवडणुकीत राजकारण झालं. मला अपमानास्पद वागणूक देण्यात आली. प्रकरण मिटवण्याऐवजी ते वाढवण्यात आले. सार्वजनिकरित्या कुटुंबाविरोधात वक्तव्य करण्यात आली, माझ्या विषयी इतका राग असेल तर नाना पटोले यांच्याबरोबर काम करू शकत नाही, परिस्थिती अशीच राहिली तर काँग्रेसमध्ये दोन गट होतील असा इशाराच थोरात यांनी दिला आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरात पटोलेंवर नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. पण काँग्रेस हाच आपला विचार आहे असे स्पष्टपणे म्हणत भाजपा प्रवेशाची शक्यता फेटाळून लावली आहे.

दरम्यान नाना पटोले यांनी याबाबत बोलताना मला या पत्राबद्दल माहिती नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.”माझं बाळासाहेब थोरात यांच्यासोबत काहीच बोलणं झालं नाही. तुम्ही त्यांच्यासोबत बोललात तर जास्त खुलासा होईल. त्यांनी लिहिलेलं पत्र मिळालं तर मी त्याबाबत बोलू शकेल.अशी प्रतिक्रिया पटोले यांनी दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!