नऊ वर्षाच्या मुलीचा बॅड स्पर्श ; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत एकावर गुन्हा दाखल


उरुळीकांचन : नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीशी बॅड टच करून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीत रविवारी (ता.20) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली घडली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एकाच्या विरोधात पॉक्सोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमन शकील शेख (वय 21, रा. कदमवाकवस्ती, ता.हवेली) असे गुन्हा दाखल झालेल्यांचे नाव आहे. तर याप्रकरणी निर्भयाच्या 30 वर्षीय आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्भया ही एकटी व अज्ञान असल्याचा फायदा घेऊन आरोपीने तिला त्याच्याकडे ओढले. तसेच तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्याशी छेडछाड करून अत्याचार केला. याप्रकरणी निर्भयाने या बॅड टच बाबतची घडलेली हकीकत तिच्या आईला सांगितली. त्यानंतर निर्भयाच्या आईने तत्काळ लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठले. आणि याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात तक्रार दिली.

त्यानुसार आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 75 सह व लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियमन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!