Bacchu Kadu : बच्चू कडूंच ठरलं!! तिसऱ्या आघाडीच्या उमेदवार यादीचा मुहूर्त लागला, समोर कुणीही नेता असो उमेदवार देणारच…


Bacchu Kadu : येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक घोषित केली आहे.

एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीत सामना रंगणार असून तर दुसरीकडे प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून वेगळी चूल मांडल्याचे चित्र आहे.

त्यातच बच्चू कडू यांनी परिवर्तन महाशक्तीची उमेदवार यादीबाबत भाष्य करत आज किंवा उद्या उमेदवारांची यादी येणार असल्याचे सुतोवाच केले आहे. तसेच समोर कुणीही नेता अथवा दिग्गज उमेदवार असला तरी आम्ही उमेदवार देणारच, असा निर्धारही आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. ते नागपूर येथे बोलत होते.

माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी, स्वराज्य पक्षाचे संभाजीराजे छत्रपती आम्ही सगळे आज बसून बैठक घेणार आहोत. ज्या आमच्या मजबूत जागा आहेत ती यादी आम्ही आज किंवा उद्या जाहीर करणार आहोत. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काय बिघाडी होते यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. Bacchu Kadu

दरम्यान, जवळपास १०० लोकांची सगळी यादी असेल. मग कोणतेही मोठा नेते असले तर त्या विरोधात आम्ही उमेदवार देणार, आम्हाला कसली भीती आणि बच्चू कडू कधीही भित नाही असे म्हणत प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीच्या यादी बद्दल भाष्य केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!