Bacchu Kadu : बच्चू कडू यांना मोठा दिलासा! हत्येच्या प्रयत्नाबाबतच्या गुन्ह्याबाबत हायकोर्टाने दिला महत्वाचा निर्णय…


Bacchu Kadu : बच्चू कडू यांना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच मोठा दिलासा मिळाला आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्याविरोधातील हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केला आहे. तसेच कोर्टाच्या निकालानंतर चांदूर बाजार पोलिसांनी हा गुन्हा रद्द केला आहे.

या प्रकरणावर न्यायमूर्ती विनय जोशी आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या समक्ष सुनावणी झाली. ही घटना ९ फेब्रुवारी २०१८ रोजी चांदूर बाजार परिसरात घडली होती. या प्रकरणात भाजपचे चांदूर बाजार नगर परिषदेचे तत्कालीन नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी ही तक्रार दाखल केली होती.

कडू व अन्य चार जणांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता, असा आरोप तिरमारे यांनी केला होता. याप्रकरणी पोलिसांनी भादंविच्या ३०७ अन्वये गुन्हे दाखल केले. कडू यांनी हा गुन्हा रद्द करण्याच्या विनंतीसह २०१८ मध्ये उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. Bacchu Kadu

हे आरोप खोटे असून तिरमारे केवळ कडू यांच्याविरुद्ध खोटे आरोप करण्याची संधीच शोधत असतात. तिरमारे यांच्याविरुद्ध विविध प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राजकीय सूडातून त्यांनी हे खोटे आरोप केले आहेत, असा युक्तिवाद कडू यांच्यातर्फे करण्यात आला.

दरम्यान, पोलिसांनी स्वत:च हे प्रकरण मागे घ्यावे, अन्यथा न्यायालय तसा आदेश देईल, असे मौखिक निरीक्षण न्यायालयाने नोंदविले होते. पोलिसांनी उत्तर दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयाने हा गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले. बच्चू कडू यांच्यातर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी बाजू मांडली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!