बाबरी मशीद, राम मंदिर खटल्यात बाजू मांडणारे जफरयाब जिलानी यांचे निधन

पुणे : बाबरी मशीद-राम मंदिर खटल्यात मुस्लीम पक्षाची बाजू मांडणारे सुन्नी वक्फ बोर्डाचे वकील जफरयाब जिलानी यांचे निधन झाले आहे. अनेक वर्षे त्यांनी या खटल्यासाठी बाजू मांडली होती.

ते ७३ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांनी लखनौच्या निशातगंज येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे देशभरात संबंध होते.
जफरयाब जिलानी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिवही होते. मे २०२१ मध्ये त्यांना ब्रेन हॅमरेजला सामोरे जावे लागले होते.

तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचे वरिष्ठ महाधिवक्ता म्हणूनही काम केले होते. वकिलीत त्यांचा मोठा अभ्यास होता. अनेक ठिकाणी त्यांनी काम केले होते.
Views:
[jp_post_view]