Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन आलं पुढे, आणखी तिघांना अटक, धक्कादायक माहिती आली समोर…

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पुण्यातून आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे. रुपेश मोहोळ, करण साळवे आणि शिवम कोहाड या तीन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातल्या उत्तम नगर आणि शिवणे परिसरातुन या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतेले आहे.
हत्येच्या कटात सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ही अटक करण्यात आली आहे. तीनही आरोपी १९ ते २२ या वयोगटातले आहेत. निर्मल नगर गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने पुण्यात ही कारवाई केली आहे.
शिवणेमधून रुपेश राजेंद्र मोहोळ, (वय २२), उत्तम नगरमधून करण राहुल साळवे, वय.१९ वर्ष आणि शिवम अरविंद कोहाड, वय.२० यांना अटक करण्यात आलीये. या प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात कालच ११ व्या आरोपीला पोलिसांनी हरियाणामधून अटक केली होती. त्यानंतर काल पुन्हा आणखी तिघांना अटक करण्यात आली असून आता आरोपींची संख्या १४ झाली आहे. Baba Siddique Murder Case
दरम्यान, बाबा सिद्दिकी यांची १२ ऑक्टोबर रोजी त्यांचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं तर एक शूटर फरार झाला होता.
पोलिसांची टीम वेगवेगळ्या राज्यात जावून धागेदोरे तपासत आहे. या हत्येची जबाबादारी जरी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली असली तरी पोलीस वेगवेगळ्या अँगलने तपास करत आहेत.