अयोध्या खटल्यातील ३ निवृत्त न्यायमूर्तींना महत्त्वाची जबाबदारी, विरोधक झाले आक्रमक…!
नवी दिल्ली : देशाच्या इतिहासातील सर्वोच्च ठरलेल्या ऐतिहासिक अयोध्या-बाबरी खटल्यातील पाचपैकी तीन न्यायमूर्तींच्या निवृत्तीनंतर तातडीने झालेल्या शासकीय नियुक्त्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
खंडीपाठातील पाचपैकी तीन न्यायमूर्तींमध्ये माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई, अब्दुल नझीर आणि अशोक भूषण यांच्या राज्यसभा खासदार, आंध्र प्रदेश राज्यपाल आणि राष्ट्रीय कंपनी कायदा अपीलीय न्यायाधिकरण याठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे.
अयोध्या खटल्याचा निकाल देशाचे ४६ वे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने नोव्हेंबर २०१९ मध्ये दिला होता. या खंडपीठात रंजन गोगोई यांच्यासह न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि अब्दुल नझीर यांचा समावेश होता.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाल्यानंतर अवघ्या दीड महिन्यातच माजी न्यायमूर्ती अब्दुल नझीर यांची आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे विरोधक केंद्र सरकारवर जोरदार टीका करत आहेत.