दहावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! पुरवणी परीक्षेची तारीख जाहीर..

पुणे : दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यात अनेक विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. मात्र काही विद्यार्थ्यांना अपयश आले आहे. आता दहावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.
बोर्डाकडून पुरवणी परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. आता नापास झालेले विद्यार्थी ही परीक्षा देऊन अकरावीला प्रवेश घेऊ शकतात. . यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा दिलासा मिळाला आहे. या परीक्षेमुळे विद्यार्थी आपली शैक्षणिक वर्ष वाया न घालवता पुढे जाऊ शकतील.
दरम्यान, SSC बोर्डाच्या माहितीनुसार, पुरवणी परीक्षा २४ जून ते १७ जुलै २०२५ या कालावधीत घेतली जाणार आहे. एकूण ८६,६४१ विद्यार्थी पुनर्परीक्षेसाठी पात्र आहेत, तर ३४,३९३ विद्यार्थी एटीकेटीसाठी पात्र ठरले आहेत. ही परीक्षा झाल्यानंतर काहीच दिवसांत निकाल जाहीर होईल आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी पात्र ठरवले जाईल.
नापास विद्यार्थीच नव्हे तर श्रेणी सुधारू इच्छिणारे विद्यार्थी देखील ही पुरवणी परीक्षा देऊ शकतात. त्यामुळे अधिक गुणांसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही ही चांगली संधी ठरणार आहे.
पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. अर्ज करताना विद्यार्थ्यांना परीक्षा फी भरावी लागणार आहे. सर्व विषयांची परीक्षा देणाऱ्यांना अधिक फी तर एक-दोन विषयांची परीक्षा देणाऱ्यांसाठी कमी फी निश्चित करण्यात आली आहे. बोर्डाकडून यासंदर्भातील सविस्तर मार्गदर्शक सूचना लवकरच प्रसिद्ध होणार आहेत.