Ashwini Jagtap : ब्रेकिंग! शरद पवारांचा भाजपला चिंचवडमध्ये धक्का? विद्यमान आमदार अश्विनी जगताप तुतारी फुंकणार? महत्वाची माहिती आली समोर….


Ashwini Jagtap : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या सामना पाहायला मिळणार आहे.

दरम्यान जागावाटपावरून मतभेद झाल्यानंतर उमेदवारीसाठी ज्याठिकाणी सोयीचे ठरेल त्या पक्षात इच्छुक पक्षांतर करताना दिसत आहेत. अशातच चिंचवड विधानसभेत भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

कारण त्यांच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप या तुतारी फुंकण्यासाठी उत्सुक असल्याचे बोलले जाते आहे. दीड महिन्यांपूर्वी अश्विनी जगतापांनी शरद पवारांसोबत याबाबत संवाद साधल्याची ही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

अश्विनी जगताप हे वेळोवेळी नाकारत आल्यात, याबाबत त्या कॅमेऱ्यासमोर ही प्रतिक्रिया देणे टाळतात. मात्र, भाजपकडून त्यांचे दिर आणि शहराध्यक्ष शंकर जगतापांना उमेदवारी देण्याबाबत हालचाली सुरु आहेत. याची कुणकुण अश्विनी जगतापांना लागल्यामुळे त्या तुतारी फुंकू शकतात, अशी चर्चा शहरभर रंगलेली आहे. Ashwini Jagtap

दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या जागी झालेल्या पोट निवडणुकीत अश्विनी जगताप आमदार झाल्या, मात्र तेंव्हा त्यांचे दिर शंकर जगताप ही देखील इच्छुक होते. देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी शंकर जगतापांना थांबण्याची आणि पुढे तुम्हाला संधी देऊ. असा शब्द दिला होता, असे नेहमी बोलले जाते. ती संधी या विधानसभेत शंकर जगतापांना मिळणार, असंच सध्याचे चित्र आहे. Ashwini Jagtap

हे अश्विनी जगतापांना लक्षात आल्याने त्या त्यांची पुढची राजकीय वाटचाल तुतारी हातात घेऊन, करू शकतात अशी चर्चा सध्या शहरभर रंगलेली आहे. त्यांच्या समर्थकांसह अश्विनी जगताप राष्ट्रवादीचं दार ठोठावत आहेत, शरद पवार त्यांना राष्ट्रवादीच्या कुटुंबात प्रवेश देण्याबाबत विचार करू शकतात आणि कदाचित दिर-भावजय अशी लढत चिंचवडमध्ये पहायला मिळू शकते.

लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप हे विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. एकाच घरातमध्ये दोघांना तिकीट मिळणे अशक्य आहे. त्यामुळे अश्विनी जगताप या वेगळा मार्ग निवडण्याच्या मनस्थितीत असल्याचे बोलले जाते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!