Ashok Pawar : पूर्व हवेलीत ४२- ड नुसार गावठाण हद्दवाढ करुन अकृषिक सनद वाटप करण्याचा आमदार अशोक पवार यांच्या सूचना! शासन निर्णय होऊन दिड वर्ष उलटल्यानंतर निर्णय राबविण्याची सुचली उपरायी…
Ashok Pawar उरुळी कांचन : शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी ‘आपला आमदार आपल्या गावी मुक्कामी’ अंतर्गत मतदारसंघातील नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार हवेली तालुक्यातील गावठाण हद्दीत राज्य सरकारने काढलेल्या शासन निर्णयानुसार ४२ ड नियमानुसार गावठाण अकृषीत करण्याचा सनद वाटप करण्याचा सूचना हवेलीच्या अप्पर तहसिलदार तृप्ती कोलते पाटील यांना दिल्या आहेत.
आमदार अशोक पवार यांनी गाव मुक्कामी दौऱ्यात सोरतापवाडी येथे ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत ही सूचना केली आहे. त्यानुसार तहसिलदार तृप्ती कोलते पाटील यांनी सनद वाटप करण्याची ग्वाही दिली आहे. आमदार अशोक पवार यांनी हवेलीतील कुंजीरवाडी, तरडे, सोरतापवाडी, वळती परिसरातील नागरिकांशी संवाद साधून प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन सदरच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केली आहे. Ashok Pawar
या दौऱ्यात ४२ ड अंतर्गत गावठाणाच्या पाचशे मिटर हद्दीतील क्षेत्राला एनए परवानगी, शेतकऱ्याच्या सातबारावरील पोटखराबा विहिताखाली आणण्याबाबत तसेच शिव रस्त्यांचा प्रश्न, लोणी काळभोर येथील अपर तहसील कार्यालयासाठी शासकीय जागेत इमारत मंजूर करण्याबाबत चर्चा करण्यात आली. आमदारांनी दिलेल्या सुचनांचे पालन करण्याचे आश्वासन तहसीलदारांनी यावेळी दिले.
सोरतापवाडी व कुंजीरवाडी गावच्या हद्दीतील खडकवासला जुना व नवीन कालव्यावरील मंजूर पुलाच्या कामाबाबत निवेदा प्रकिया लवकरात लवकर पुर्ण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना विनंती करण्यात आली. पुणे-सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी गावच्या हद्दीतील आडवा पुल येथे रस्त्याला अंडरपास करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
बोरीऐंदी सब स्टेशनमधून दोन फिडर देण्यात येणार आहे. त्यामुळे वळती फिडरचा लोड विभागून त्यांचा फायदा वळती, शिंदवणे, तरडे, आळंदी म्हतोबाची या परिसराला होणार आहे. वळती तसेच रोमोशी वस्ती, आळंदी येथे अधिकच्या रोहित्राची मागणी असून त्याचे अंदाज पत्रक त्वरीत तयार करण्याच्या सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. कोळेकर वस्ती येथील नवीन रोहित्रावर भार टाकण्याची मागणी तरडे ग्रामस्थांची होती. ती मान्य करून लवकरात लवकर काम मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या.
दरम्यान, आमदार पवार यांनी ट्रान्सफॉर्मर बदलणे, काही ठिकाणी वीज मिळत नाही, त्या ठिकाणी पोहचवण्याच्या सूचना महावितरणला करण्यात आल्या. यावेळी उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे, हवेली भुमिअभिलेख अधीक्षक अमरसिंह पाटील, लोणी काळभोरच्या अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते, हवेलीचे गटविकास अधिकारी भूषण जोशी, विविध गावाचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागरिकांना हक्क मिळून देण्यात आमदार महोदयांना फार उशीर..
पूर्व हवेलीत ४२ ड अंतर्गत लोकसंख्येनुसार गावठाण हद्दीत अकृषित सनद वाटप करण्याचा अधिकार जिल्ह्यातील नागरीकांना दिड वर्षापूर्वी मिळाला आहे. परंतु हवेलीत मात्र निर्णयाची अंमलबजावणी करण्यास दिड वर्षाचा विलंब केला आहे. अशीच परिस्थिती शेतकऱ्यांच्या वीजेच्या बाबतीत असून वळती फिडवरील शेतकरी वीजेच्या खंडीतपणाने त्रस्त असताना निवडून तोंडावर प्रश्न सोडविण्यासाठी हा खटाटोप सुरू असल्याचा संताप काहींनी व्यक्त केला आहे.