मोठी बातमी! नगरसेवक हत्या प्रकरणात अरुण गवळीला जामीन मंजूर, वयाचा विचार करुन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय..


मुंबई : कुख्यात डॉन अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला आहे. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर गवळीला सुनावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेवर अपील अद्याप प्रलंबित आहे.

वय आणि अपीलवरील प्रलंबित सुनावणीचा विचार करून गवळीला न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंग यांच्याकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.अरुण गवळीने जन्मठेप प्रकरणी आतापर्यंत 17 वर्षे कारागृहात शिक्षा भोगली आहे. त्याचे वय सध्या 76 वर्षे असून, वयाचा विचार करुन त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एमएम सुंदरेश आणि न्यायमूर्ती कोटिश्वर सिंह यांनी कमलाकर जामसांडेकर खून प्रकरणात तुरुंगात दीर्घकाळ तुरुंगवास भोगल्यामुळे अरुण गवळीची जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. अरुण गवळीची बाजू अ‍ॅड. हडकर आणि अ‍ॅड. मीर नगमन अली यांनी मांडली आहे.

अरुण गवळी याला ज्यावेळी कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्या प्रकरणात अटक झाली तेव्हा अरुण गवळी आमदार होता. एखाद्या आमदाराला अशा प्रकारे खुनाच्या गुन्ह्यात नंतर जन्मठेप सुनावण्यात आली होती. एखाद्या राजकीय नेत्याच्या खूनात आमदाराला झालेली ही जन्मठेप चर्चेची ठरली होती.

2 मार्च 2007 रोजी सायंकाळी आपल्या मुंबईतील घाटकोपर येथील घराजवळ बसलेल्या शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची गुंडांनी गोळ्या घालून हत्या केली होती. ते आपले काम संपवून घरात टीव्ही पाहात असताना असल्फा व्हीलेज येथील रुमानी मंझील चाळीतील घरात शिरुन मारेकऱ्यांनी त्यांची हत्या केली होती.

कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्या प्रकरणात मुंबईती सत्र न्यायालयाने अरुण गवळी आणि इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होता.सुरेश पांचाळ, दिनेश नारकर आणि गणेश साळवी या सह आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली होती.

त्यावेळी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकात शिवसेनेचे कमलाकर जामसंडेकर यांनी अरुण गवळी याच्या अखिल भारतीय सेना पक्षाचे उमेदवार अजित राणे याचा अवघ्या ३६७ मतांनी पराभव केला होता. त्यानंतर काही काळात जामसंडेकर नगरसेवक म्हणून कामाला लागले असतानाच त्यांची हत्या करण्यात आली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!