मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना अटक करा, ‘या’ बड्या नेत्याची मागणी, नेमकं काय आहे प्रकरण?


पुणे : भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच एक गौप्यस्फोट केला आहे. एका जरी कार्यकर्त्याने बेईमानी केली तर याद राखा, सगळ्यांचे फोन सर्व्हिलन्सवर टाकले आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुपवर तुम्ही कोणाशी काय बोलात, कोणाशी काय संवाद साधता ते सगळं आम्हाला कळत आहे, अस खळबळजनक विधान बावनकुळे यांनी केले आहे. या विधानावरून शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली असून, बावनकुळे यांच्यावर इंडियन टेलिग्राफ ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

त्यांनी भाजप सरकारवर बेकायदेशीर फोन टॅपिंग आणि खाजगी जीवनात हस्तक्षेप केल्याचा आरोप केला आहे. भंडाऱ्यातील कार्यक्रमात बावनकुळे यांनी सांगितलं की, “एका जरी कार्यकर्त्याने बेईमानी केली, तर याद राखा, सगळ्यांचे फोन सर्व्हिलन्सवर आहेत.

       

व्हॉट्सॲप ग्रुपवर कोण काय बोलतो ते आम्हाला माहित आहे. या विधानानंतर राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे. विरोधी पक्ष नेत्यांनीही या वक्तव्यावर सरकारकडून स्पष्टीकरण मागितलं आहे.

संजय राऊत म्हणाले, बावनकुळे यांनी जणू महाराष्ट्रात पेगॅसिससारखं मशीन बसवलं आहे. त्यांनी किंवा भाजप कार्यालयात अशा प्रकारचं उपकरण लावलं आहे का? हे केवळ त्यांच्या पक्षापुरतं नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेत्यांचे फोन, व्हॉट्सॲप आणि संवाद यावर लक्ष ठेवण्यात येतंय. त्यांनी पुढे सांगितलं की, “मुंबईतील काही बिल्डर्स, नागपूरमधील यंत्रणा आणि भाजपचे काही मंत्री एकत्र येऊन खाजगी वॉर रूम तयार केली आहे.

राऊत यांनी गंभीर आरोप करत म्हटलं की, या सर्व्हिलन्समध्ये केवळ भाजपचेच नव्हे तर शिंदे गट, ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादीचे शरद पवार गटातील नेते यांच्यावरही नजर ठेवली जात आहे. “हा प्रकार घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे. लोकांच्या खाजगी जीवनात घुसखोरी करण्याचं हे षड्यंत्र आहे, असं ते म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!