Arjun Khotkar : लाडकी बहिण योजनेवरून शिवसेना नेत्याचा अजब सल्ला, म्हणाले, सासू-सूना कागदपत्री वेगळ्या..
Arjun Khotkar : महाराष्ट्रात सध्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला तहसील कार्यलयात गर्दी करत आहेत. यातून महिलांना आर्थिक पाठबळ मिळणार आहे. या शिवाय वर्षा तब्बल 3 घरगुती गॅस सिलेंडर मोफत देण्याची योजनाही जाहीर करण्यात आली आहे.
मात्र या योजनांचा लाभ घेण्यासाठी माजी मंत्री आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी महिलांना अजब सल्ला दिला आहे. लाडकी बहीण आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या गॅस सिलेंडर योजनेचे लाभ घेण्यासाठी सासू सुनांनी कागदपत्री वेगवेगळं राहण्याचा अजब सल्ला अर्जुन खोतकर यांनी महिलांना दिला आहे. Arjun Khotkar
अर्जुन खोतकर काय म्हणाले?
तुम्ही सर्वजणी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहात. म्हणून घरच्यांना फा@#X मारू नका, अर्जुन खोतकर म्हणालेत. एका परिवारासाठी मुख्यमंत्र्यांनी 3 सिलेंडर जाहीर केलेत, मात्र तुम्ही थोडी चालाखी करा. सासू- सूना वेगवेगळ्या रहा फक्त कागदपत्री म्हणजे तुम्हाला गॅस सिलेंडर वाढवून मिळतील, असा सल्ला अर्जुन खोतकर यांनी दिला आहे.
जालन्यामध्ये गायरान हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला शिवसेना नेते अर्जुन खोतकर यां उपस्थित होते. या परिषदेला मोठ्या प्रमाणावर महिलांची उपस्थिती होती. यावेळी केलेल्या भाषणात अर्जुन खोतकर यांनी उपस्थित महिलांना उद्देशून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून हा सल्ला दिला आहे.