पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या आराखड्यास मान्यता, कामाला मिळणार गती..


पुणे : पुणे महामेट्रोने दुसऱ्या टप्प्याची तयारी केली. महामेट्रोने दुसऱ्या टप्प्याचा प्रकल्प विकास आराखडा महापालिकेला सहा महिन्यांपूर्वी सादर केला. महापालिकेने हा आराखडा तत्त्वत: मान्य केला आहे.

लवकरच हा आराखडा मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर मांडण्यात येणार आहे. त्यामुळे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचा रखडलेला मार्ग अखेर मोकळा झाला आहे. महामेट्रोकडून पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम वेगाने सुरू आहे.

दरम्यान, महापालिकेच्या विविध विभागांच्या मंजुरीनंतर तो अंतिम मंजुरीसाठी लवकरच स्थायी समितीसमोर सादर करण्यात येईल. पुणे महापालिकेच्या हद्दीतील मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सुमारे साडेबारा हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

प्रत्यक्षात महापालिकेला केवळ भूसंपादनाचा खर्च करावा लागणार आहे. केंद्र आणि राज्याकडून प्रत्येकी २० टक्के रक्कम मिळणार असून, उरलेली ६० टक्के रक्कम कर्ज स्वरूपात महामेट्रो उभारेल, असेही सांगितले जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!