तुर्कीचे राजदूत व नागरिकांकडून भारताचे कौतुक…!


नवी दिल्ली : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये सोमवारी पहाटे झालेल्या 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने दोन्ही देशांमध्ये प्रचंड हाहाकार माजवला आहे. या भूकंपामुळे आतापर्यंत 5100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 21000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

दरम्यान या मोठ्या भूकंपाच्या संकटात सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी भारताने दोन विमानांद्वारे मदत साहित्य आणि वैद्यकीय पथक पाठवले आहे. यानंतर तुर्कस्तानच्या नागरिक देखील भारतीयांचे आभार मानायला विसरले नाही. भारताने तुर्कस्तानमधील भूकंपग्रस्त भागात ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना शोधण्यासाठी विविध उपकरणे पाठवली आहेत.

भारताने पाठवलेल्या शोध आणि बचाव कर्मचार्‍यांचा एक गट, विशेष प्रशिक्षित श्वान पथक, ड्रिल मशीन, मदत सामग्री आणि औषधे घेऊन तुर्कीच्या एडनमध्ये दाखल झाले.भारताकडून तातडीने पाठवलेल्या या मदतीबद्दल तुर्कीने आभार मानले आहेत. तुर्कस्तानचे भारतातील राजदूत फिरत सुनेल यांनी सांगितले की, ‘मला खूप आनंद झाला आहे की भूकंपानंतर काही तासांतच भारताने या संकटात मदत करण्यासाठी तत्काळ पावले उचलली आणि बचाव पथके तुर्कीला पाठवण्याचा निर्णय घेतला. आता आपण तुर्कीमध्ये भारतीय पथक पाहू शकतो, जे तेथे बचाव कार्यात मदत करत आहेत.

भारताला मित्र असल्याचे सांगताना तुर्कीचे राजदूत म्हणाले, ‘भारतासाठी माझा एकच शब्द आहे, मित्र… मित्र एकमेकांना मदत करतात. आणि इथे भारताने तुर्कस्तानला मदत केली. जर आपण एखाद्याला मित्र मानले तर नेहमीच असे घडते. या प्रकरणात भारताची प्रतिक्रिया अतिशय जलद होती.’ तुर्कस्तानमधील सद्यस्थितीची माहिती देताना ते म्हणाले, ‘पहिल्यांदा 7.7 आणि नंतर 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्यांनी सांगितले की, या आपत्तीत 21 हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत आणि14 हजारांहून अधिक अधिकारी आणि 5 हजाराहून अधिक लष्करी जवान मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!