त्यांची ब वर्गात ताकद म्हणून तिथून अर्ज भरलाय, माळेगाववर 425 कोटींचे कर्ज!! रंजन तावरे यांनी अजित पवारांना टोला लगावत सगळंच सांगितलं…


बारामती : येथील माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूकीत रंगत वाढली आहे. याठिकाणी ही निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिष्ठेची केली आहे. तसेच विरोधकांनी देखील मोर्चेबांधणी केली आहे. यामुळे या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

माळेगावचे माजी अध्यक्ष रंजनकुमार तावरे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. राज्याच्या उपमुख्यमंत्री बरोबर या निमित्ताने काम करण्याची संधी मिळेल, त्यामुळे आम्ही आम्हाला भाग्यवान समजतो, असा खोचक टोला यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला आहे. यामुळे वातावरण तापले आहे.

या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ब वर्गातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे आता चुरस वाढली आहे. याबाबत आज तावरे म्हणाले, अजित पवार यांनी ज्या प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, त्या ब वर्ग प्रतिनिधी मंडळामध्ये त्यांची ताकद आहे.

त्यामुळे ते तेथे निवडून येतीलही मात्र आमचाही उमेदवार ताकदीने निवडणूक लढवेल. मात्र ही निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही. उपमुख्यमंत्र्यांच्या उमेदवारीचे मी स्वागत करतो आणि आम्ही स्वतःला भाग्यवान देखील समजतो की, कारखान्यात काम करताना राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसोबत काम करण्याची संधी आम्हाला मिळेल.

त्यांच्याबरोबर काम करताना आम्हाला बरेच काही शिकायला मिळेल, असा टोला त्यांनी लगावला. तसेच ते म्हणाले, माळेगाव कारखान्यावर 425 कोटींचे कर्ज आहे. माळेगाव कारखाना वाचवायचा हाच एकमेव आमचा विचार असून या कारखान्यावर कधी नव्हे ते सव्वा चारशे कोटींचे कर्ज या संचालक मंडळाने करून ठेवले आहे, असेही ते म्हणाले. यामुळे निवडणुकीत नेमकं काय होणार हे लवकरच समजेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!