महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप निश्चित? देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण…!!

Devendra Fadnavis : राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दावा केला आहे. महाविकास आघाडीमध्ये कुणाचा पायपोज कुणाच्या पायात नाही. अनेक लोक महाविकास आघाडीतून बाहेर पडतील. असा मोठा दावा फडणवीस यांनी केला आहे.
त्याचबरोबर वंचित आणि महाविकास आघाडी मध्ये काय झालं? हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्या संदर्भात मला काही बोलायचं नाही अशी टीका देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केली आहे.
त्याचबरोबर यावेळी फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर देखील निशाणा साधला आहे. ते म्हणालो म्हणाले, “आम्हाला उद्धव ठाकरेंचा खूप वर्षाचा अनुभव आहे. आम्हाला याची सवय आहे.
जर काँग्रेसला त्यांच्यासोबत राहायचं असेल तर त्यांना देखील ही सवय करून घ्यावी लागेल कारण ते असंच वागतात. असा टोला देखील फडणवीस यांनी लगावला आहे