मुंबईत मोनोरेलचा पुन्हा अपघात ; डबा पटरीवरून घसरल्याने मोठी दुर्घटना…


मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा मोनो रेलबाबत मोठी दुर्घटना घडली आहे.वडाळा येथे चाचणी घेत असलेल्या एका मोनोरेल ट्रेनचा डबा पटरीवरून खाली उतरून एका बाजूला झुकल्याने मोठा अपघात झाला आहे. हा अपघात वडाळा पूर्व येथील आरटीओ जंक्शनजवळ घडला. सुदैवाने यात प्रवासी नव्हते. त्यामुळे कोणीही जखमी झालेले नाही.या अपघातामुळे ट्रेनचे अलाइनमेंट पूर्णपणे बिघडले आहे.

महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, अत्याधुनिक सिग्नल प्रणाली आणि नवीन गाड्यांची चाचणी सुरू असताना आज वडाळा परिसरात मोनोरेलचा अपघात घडला. यावेळी ट्रायल रन सुरु असताना मोनोरेलचा एक डबा पटरीवरून खाली उतरून एका बाजूला झुकला. या नवीन मोनोरेल रॅकचा एक डबा ट्रॅक बदलत असताना काही तांत्रिक बिघाडामुळे रुळावरून खाली घसरला. तो बाजूला झुकून ट्रॅकच्या बाजूला असलेल्या खांबावर आदळला. सुदैवाने, यावेळी परिस्थिती तत्काळ नियंत्रणात आणली गेली. यामुळे कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

या अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल, मोनोरेलचे कर्मचारी आणि एमएमआरडीए अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या घसरलेला डबा काढण्याचे आणि ट्रॅक दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. नवीन तंत्रज्ञान आणि गाड्यांच्या चाचणीदरम्यानच इतका मोठा बिघाड झाल्याने, मोनोरेलच्या नवीन रॅकच्या सुरक्षिततेवर आणि कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह समोर आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!