महायुतीच्या आणखी एक मंत्र्याचा पाय खोलात; ठाकरे गटाच्या शिलेदारांन साधला निशाणा

पुणे : गेल्या काही दिवसांपासून महायुती चांगलीच बॅकफूटवर आली आहे . राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे ऑनलाईन रमी खेळत असल्याच्या आरोपावरून घेरले असताना दुसरीकडे महायुती सरकारवर हनी ट्रॅपचे आरोप सुरू आहेत. अशातच आता महायुतीचा आणखीन एक मंत्री अडचणीत आला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह त्यांचे वडील माजी मंत्री रामदास कदम आणि बंधू सिद्धेश कदम यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. परब यांनी आता या तिघांवर सावली डान्सबार आणि वाळू प्रकरणात पुन्हा नव्याने कागदपत्रासह आरोप करत घेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. दरम्यान परब यांचे आरोप गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी फेटाळून लावले होते. तर, रामदास कदम यांनी परमिट पत्नीच्या नावावर असले तरी डान्स बारशी संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले होते.
तसेच आईच्या नावावर बारसे परमिट काढता आणि बायका नाचवायला लाज नाही वाटत का असा थेट सवाल देखील अनिल परब यांनी विधान परिषदेत कदम यांच्यावर केला आहे. त्यांच्या या निशाण्यामुळे शिंदे गटाच्या मंत्र्याच्या अडचणीत आणखीन वाढ होणार आहे.
