काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का ; अमरावतीतील ‘हा ‘बडा नेता हजारो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश करणार..


पुणे : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाला गळती लागली आहे. पक्षातील अनेक नेते सत्ताधाऱ्यांसोबत जात आहेत. दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना आता काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.अमरावतीच्या वरुड मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे सुपुत्र विक्रम ठाकरे काही वेळातच भाजपात प्रवेश करणार आहेत.

विक्रम ठाकरे यांचा आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश होणार आहे. भाजप नेते, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत विक्रम ठाकरे हे भाजपात प्रवेश करणार आहेत. अलीकडेच विक्रम ठाकरे यांनी अपक्ष विधानसभेची निवडणूक देखील लढवली होती. या कार्यक्रमाला खासदार अनिल बोंडे, आमदार उमेश यावलकर यांची देखील उपस्थिती असणार आहे.

दरम्यान दुसरीकडे काँग्रेसला जळगावात देखील मोठा धक्का बसला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज आणि उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. जळगावच्या शिवतीर्थ मैदानावर अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा तसेच सभा पार पडणार आहे. याच कार्यक्रमामध्ये काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांच्यासह तब्बल वीस ते पंचवीस हजार आदिवासी कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत.त्यामुळे हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!