Animal : रणबीर कपूरचा सिनेमा ठरतोय बिग हिट! ॲनिमल चित्रपटाने जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला, आकडा वाचून व्हाल थक्क..


Animal : अभिनेता रणबीर कपूरचा ‘ॲनिमल’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी रणबीर कपूरच्या सर्वाधिक ओपनिंग करण्याऱ्या चित्रपटाचा किताब पटकावला आहे. या चित्रपटामधील ॲक्शन सीन्सचे आणि चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाचेअनेकजण कौतुक करत आहेत.

या चित्रपटाच्या ट्रेलरपासूनच या चित्रपटाविषयी बरीच चर्चा झाली होती आणि आगाऊ बुकिंगमध्येही चित्रपटाला मोठा नफा मिळाला होता. हा चित्रपट १ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि त्यासोबत विकी कौशलचा सॅम बहादूर हा चित्रपट आला.

निमल चित्रपटाने ७ दिवसांत ३३८ कोटींची कमाई केली होती. रिलीजच्या ८ व्या दिवशी या चित्रपटाने २३. ५० कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे ८ दिवसात चित्रपटाचे एकूण कलेक्शन ३६१ कोटी झाले आहे.  ज्या वेगाने हा चित्रपट वाढत आहे, त्यावरून तो काही दिवसांत ५०० कोटींचा टप्पा पार करेल, असे दिसते. आता हा टप्पा हा चित्रपट किती वेगाने गाठतो हे पाहायचे आहे.

संदीप वंगा रेड्डी यांनी दिग्दर्शित केलेला ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट पिता-पुत्राच्या नात्यावर आधारित आहे. या चित्रपटात अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना आणि तृप्ती डिमरी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. Animal

चित्रपटात अनिल कपूर रणबीरच्या वडिलांच्या भूमिकेत, रश्मिका पत्नीच्या भूमिकेत आणि बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे. ‘ॲनिमल’ या सिनेमाला सेन्सॉरने ‘A’ सर्टिफिकेट दिले आहे.

दरम्यान, विकी कौशलच्या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन निराशाजनक आहे. या चित्रपटाला समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे, रिलीजच्या ८ दिवसांत चित्रपट ५० कोटींची कमाई करू शकला नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!