Anil Deshmukh : अजित पवार गटाचे सर्व आमदार अडचणीत, अनिल देशमुख यांनी केले मोठे वक्तव्य, चर्चांना उधाण…
Anil Deshmukh मुंबई : राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू असून या अधिवेशनात अनेक विषयावर चर्चा होणार आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याची पूर्ण तयारी केलेली आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रवादीच्या फुटीनंतरचे हे पहिलेच हिवाळी अधिवेशन आहे.
अधिवेशनाच्या एक दिवस आधीच राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख Anil Deshmukh यांनी मोठे विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे अजितदादा गटाच्या सर्व आमदारांची अडचण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. अजितदादा गटाच्या आमदारांना व्हीप काढला जाणार आहे का?, असा सवाल अनिल देशमुख यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले की, मागच्या अधिवेशनावेळी अजितदादा गटाचे आमदार कामकाजात सहभागी झाले नाहीत.
केवळ लॉबीत फिरत होते. त्यामुळे त्यांना शरद पवार यांच्याकडे जाण्यात रस आहे हे स्पष्ट होते. पुढच्या काळात या सर्वांची घर वापसी बघायला मिळेल, असे सांगतानाच या अधिवेशनात व्हीप काढायचीच वेळ आली तर तो नक्की काढू. काही अडचण नाही, असे अनिल देशमुख म्हणाले आहे.
ते पुढे म्हणाले की, देशमुख यांच्या म्हणण्यानुसार अजितदादा गटाच्या आमदारांना व्हीप पाठवल्यास त्यांच्यावर आता कारवाई होणार नाही. मात्र, कायदेशीर लढाईत हा व्हीप महत्त्वाचा ठरेल. तेव्हा मात्र, अजितदादा गटाच्या आमदारांची अडचण वाढू शकते, असं राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
दरम्यान, अजितदादा गटाचे आमदार द्विधा मनस्थितीत असल्याचा दावाही अनिल देशमुख यांनी केला. अजित पवार गटाचे आमदार द्विधा मनस्थितीत आहेत. या सरकारकडून आपल्या मतदारसंघातील जेवढी शक्य असेल तेवढी कामे काढून घ्यायची आणि नंतर परत शरद पवारांकडे यायचे असा विचार करत आहेत. खूप मोठ्या संख्येत आमदार घर वापसी करतील, असा दावा देखील देशमुख यांनी केला आहे.