..अन् मुख्यमंत्र्यांच्या शब्दांनी मिळाला इर्शाळवाडी ग्रामस्थांना जीवन जगण्याचा धीर, मुख्यमंत्री १५ किलोमीटरचा निसरटा रस्ता तुडवीत दिवसभर मदतकार्यात, शरद पवार यांच्या कृतीची आठवण..!


मुंबई : काल गुरुवार , दर गुरुवारी उपवास करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अक्षरशः उपाशी पोटी दुर्घटनास्थळी पोहोचले. इर्शाळवाडी कडे मार्गस्थ होताना प्रचंड पाऊस, निसरडी वाट. त्यातच माहिती आली की बचाव कार्यातील अग्निशमन दलातील एक जवान दुर्घटनास्थळी जाताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन पावला.

खरे तर याच घटनेमुळे दुर्घटनास्थळी जाण्याचा मुख्यमंत्री महोदयांचा निर्धार आणखी पक्का झाला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कृतीची तब्बल ३० वर्षानंतरची शरद पवार यांच्या कृतीची आठवण संबंध महाराष्ट्राला झाली.

मदत कार्यात असणाऱ्या इतर जवानांचे आपल्या सहकाऱ्याच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे मनोधैर्य खचू नये म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी ज्या ठिकाणी मदत होते कार्य सुरू आहे. तिथे तात्काळ जाण्याचा निर्णय घेतला. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुसळधार पाऊस व निसरडी डोंगराळ पायवाट तुटवत दुर्घटना झालेल्या इर्शालवाडीत पोहचले.

वाटेत जाताना मृतांचे कुटुंबीय – नातेवाईक भेटले , त्यांना मुख्यमंत्री महोदयांनी दिलासा दिला, त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. अक्षरशः जीवानिशी वाचलेल्या या सर्व नागरिकांना मी तुमच्या घरातील आहे, तुमचा आहे , तुमच्या पाठीशी नव्हे तर सोबत आहे, काळजी करू नका असा धीर दिला.

मुख्यमंत्री महोदय दुर्घटनास्थळी पोहोचले आणि NDRF, TDRF आणि अग्निशमन दलातील सर्व जवानांना आश्वस्त केले, धीर दिला. काल मुसळधार पावसात अवघड पाऊलवाटेने चालत किमान १४ ते १५ किलोमीटर पायी प्रवास झाला असेल.

समवेत चालणारी तरुण मंडळी थकली…पण हा माणूस थकला नाही; थांबला नाही. एक शिवसैनिक असल्याचा प्रत्यय या कार्यात झोकून दिलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कृतीने दिसून आला.सलग १८ ते २० तास , न थकता – न थांबता काम करणारा अद्वितीय नेता महाराष्ट्राने पाहिला आहे. अशी आठवण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कृतीनंतर ३० वर्षांपूर्वी किल्लारी येथे झालेल्या भूकंपात तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी दाखविलेल्या समयसूचकतेची झाली आहे.

शरद पवार यांना किल्लारी येथे झालेल्या भूकंपाची बातमी कळताच, ते पहाटे तीन वाजता किल्लारीच्या दिशेने निघाले होते. तिथे त्यांनी मदतकार्यात सहभागी होऊन प्रशासनाला विशेष सूचना दिल्या तसेच ग्रामस्थांना मायेचा धीर दिला होता. त्यानंतर किल्लारी भूकंप ग्रस्तांच्या मदतकार्यात केलेल्या उल्लेखनीय काम आजही देशात स्मरणात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!